मी बाप्पा बोलतोय
प्रिय भक्तांनो, प्रत्येक वर्षी जेव्हा तुम्ही मला आपल्या घरी, गल्लीत, मंडपात आणता तेव्हा माझे हृदय आनंदाने भरून जाते. घराघरांतून येणारा "गणपती बाप्पा मोरया" हा जयघोष होताच मला तुमच्या प्रेमाची प्रचिती येते. मी मूर्तीमध्ये असलो तरी प्रत्यक्षात तुमच्या हृदयात वास करतो. तुमच्या हसऱ्या चेहऱ्यात, छोट्या मुलांच्या किलबिलाटात, स्त्रियांच्या आरतीत, तरुणांच्या उत्साहात आणि वृद्धांच्या भक्तीत मी स्वतःला अनुभवतो. दहा दिवसात तुम्ही मला फुलं, नैवेद्य, मोदक अर्पण करता; पण मला खरा आनंद तुमच्या हृदयातील श्रद्धा, निरागस प्रेम आणि निर्मळ भावनेतून मिळतो. तुमची आरती करताना तुमच्या डोळ्यांत चमकणारे भाव पाहून मला वाटते की, माझे आगमन खऱ्या अर्थाने यशस्वी झाले.. मला प्रेमाने घरी आणता, पण कधी कधी त्या आनंदोत्सवात विसरता की माझे खरे रूप म्हणजे ज्ञान, सद्गुण, शांतता आणि समत्व. दगडामध्ये, मातीमध्ये किंवा शाडूमध्ये मी मर्यादित नाही; मी सृष्टीच्या कणाकणात आहे.मी तुमच्या प्रार्थना ऐकतो, अश्रू पाहतो, तुमच्या मनातील भीती आणि चिंता जाणतो, जोडलेला प्रत्येक हात आणि आणि त्यामाघची भावना ही मला ठाऊक आहे....