Posts

Showing posts from June, 2021

कोरोना बस करो ना ....

Image
एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त लोटला गेला असून अजूनही कोरोनाचा तांडव भारतात चालूच आहे. कधीही न विचारात आलेले शब्द आज अनुभवायला मिळत आहेत. अचानकपणे आलेलं महामारीचं संकट केव्हा टळेल हे काही सांगता येत नाहीये कारण जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील तज्ञ डॉक्टर तिसरी आणि चौथी लाट येईल हे सांगत आहेत आणि सध्या चालू असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे होत असलेला मृत्यूचा तांडव पाहता तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा हाहाकार काय असेल??  बऱ्याच दिवसानंतर " कोरोना बस करो ना  " हा लेख लिहीत आहे आणि लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा होत असलेला बाजार आणि त्याची दुरवस्था!!  सध्याची परिस्थिती अजूनही पाहता अजूनही हाताबाहेर असल्याचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं कारण प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकांना वाचण्यासाठी जिवाचं रान करत आहे. काही महिन्यांपूर्वी रुग्णांची आकडेवारी थोडी फार कमी झाली होती मात्र ते कळताच नागरिकांनी निष्काळजीपणे बाहेर विना मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझर वापरताच फिरायला सुरुवात केली आणि आता आपण पुन्हा त्याच वळणावर आहोत असं काहीसं अनुभवायला मिळत आहे. आपल्या देशातील ...