Posts

Showing posts from July, 2021

ट्रेकिंग!

Image
इतक्या दिवसांच्या विश्रांतीनंतर सहजच पुण्याला येण्याचा योग्य आला आणि मग काय इथलं वातावरण पाहून मन चलबिचल तर होणार हे साहजिकच!  अलगद पडलेली धुक्याची चादर, रिमझिम रिमझिम पावसाची चाहूल, चहुबाजूंनी उंच डोंगर-दऱ्या, माणसांची झुंबड अन रम्य वातावरण हीच खरी ओळख पुण्याच्या पावसाळ्याची.... मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर डाव्या बाजूला घोराडेश्वर म्हणून महादेवाचं उंच डोंगरावर गुफेत वसलेलं मंदिर आणि ट्रेकिंग साठी हे खूप सुंदर ठिकाण आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण म्हणजे जणू काय सुंदर पर्वणीच! खालपासून जवळपास 1000 पायऱ्या, चालताना चढ-उतार, उंच टोकाला जाईपर्यंत श्वासाची होणारी धडधड, जसं जसं वर चढताल तसं तसं वाढणारा प्रचंड उत्साह, वरती पोहचल्यावर गुफेत महादेवाची स्वयंभू पिंड, आजूबाजूला छोटं-छोटे तलाव, नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ, फोटो काढण्यासाठी उत्कृष्ट ठिकाण अन हे सर्व पाहता आठवते ती फक्त निसर्गाची किमया... ज्याप्रमाणे छोटंसं वर्णन मी लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे मला सुद्धा तिथे गेल्यावर फोटो काढायचा आणि डोंगरावर चढायचा मोह आवरला नाही आणि त्यातूनच हा नकळत काढलेला फोटो... मन तृप्तच !!