जयघोष चाले तुझा मोरया! 🙏🏻🚩
अगदी लहान असताना आजीच्या आणि आईच्या गोष्टींच्या माध्यमातून परिचयात आलेला पहिला देव म्हणजे गणपती बाप्पा. याचं गोष्टींच्या माध्यमातून बाप्पा कधी आपल्या मनावर अधिराज्य गाजवून स्वतःची वेगळीच छाप सोडत प्रत्येक भक्ताच्या अडीअडचणीत पाठीशी कायम उभा असतो हे सर्वांना ठाऊक आहे. गणेशोत्सवाची वाट अगदी लहाण्यापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण आतुरतेनं पाहत असतो कारण गणरायाच्या आगमनाने मिळणारी स्फूर्ती, ऊर्जा ही कायम पाठबळ देत असते. गणेशोत्सव म्हणलं की पहिलं नाव आठवतं ते मुंबई आणि नंतर पुणे. या सुरेख बाप्पांना पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी पहायला मिळते. गणेशोत्सव सर्वच ठिकाणचे पाहण्यासाखेचं असतात परंतु मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सवाची गोष्टच निराळी. भव्य-दिव्य फुलांची आरास, कमीतकमी 20 फुटांची बाप्पाची मूर्ती, बाप्पाच्या मूर्तीवर अप्रतिम दागिने, चहुबाजूस विद्युत रोषणाई, विशाल देखावा, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि मंडळात कार्यरत असलेले हजारो स्वयंसेवक ही बाब नवल करण्यासारखीचं! मुंबई मधील मानाच्या गणपतींपैकी मुंबईचा राजा म्हणजेच गणेश ...