नातं मित्रत्वाचं
...मी आहे ना या उद्गाराच्या सुरुवातीपासून विश्वासाच्या एका वेगळ्याच नात्याची सुरुवात होते. वाचक रसिकांना आणि मित्रांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नवीन लेख आहे तरी काय आणि त्याचा विषय काय? हो याचं उत्तर म्हणजे नातं मित्रत्वाचं आणि लिहण्याचा कारण म्हणजे विश्वासाने आणि आपुलकीने तयार झालेलं नातं म्हणजे मित्र....
चला मग आता मुख्य मुद्दा लिहायला सुरुवात करू.. आपण जन्माला येतो आणि आपल्या परिवारात मोठे होतो वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घडत जातो त्याचप्रमाणे मित्रांच्या सानिध्यात सुद्धा घडत असतो. आता हे मित्र होतात कशे ? हो सांगतो बालपणी शाळेत गेल्यानंतर कुठलाही मुलगा किंवा मुलगी आपल्या ओळखीचे नसते हळू-हळू गप्पा-गोष्टी रंगल्यानंतर आपण त्यांना आपलं मानायला लागतो आणि तोच अज्ञात मुलगा आपला मित्र होतो. आता शिक्षणाचा नवीन टप्पा येतो तो म्हणजे शाळा. शाळेत गेल्यानंतर सुद्धा अनेक अज्ञात मुलं मित्र बनतात आणि काही दिवसांच्या सोबतीनंतर अत्यंत विश्वासू आणि जिगरी यार होतात. अशाच काही मित्रांची मिळून टोळी (गॅंग) तयार होते आणि कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडणार नाहीत अशी वचने एकमेकांना देतात.
शिक्षण शिकत असताना अनेक आनंदाच्या आणि अडचणींच्या सामोरी जावं लागतं त्यासाठी पाठीवर खंबीर थाप हवीय आणि तो देणारा आपला जिवलग मित्र, एखाद्याने आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याला पहिल्यांदा उत्तर देणारा आपला मित्र, आपल्यासोबत नेहमी मज्जा करणारा आपला मित्र, बाहेर फिरायला, खायला, धिंगाणा घालायला आणि मांडायला गेलं तर बाकीच्या मुद्द्यांना जागाच नाही राहणार.!
कधी आपुलकी, कधी भांडण मात्र कुठल्याही आणि कोणत्याही परिस्थितीत मित्रावरच प्रेम कमी होणार नाही याची खात्रीच.! आलेल्या संकटांना आपल्या अगोदर आपला मित्र पुढे जाऊन सामना करतो आणि आपल्याला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही. कधी कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाही कारण आपल्या परिवारानंतर आपण कोणावर सर्वात जास्त विश्वास ठेवत असतो तो आपला मित्र..नातं मित्रत्वाचं हा लेख लिहायचा मुद्दा म्हणजे मित्रांबद्दल काहीसं मांडण्याचा प्रयत्न होय.!
``मैत्री म्हणजे माणुसकी जपण्याचा- जोपासण्याचा धागा आणि त्या धाग्यात विश्वास आणि आपुलकीची माळ गुंफलेली आहे.``
खऱ्या मैत्रीचे अनेक अनुभव लिहायला येतील परंतु ते न लिहिलेलेच चांगले कारण चांगल्या मित्रांमध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात.अशाच एका मित्राची ओळख आणि त्यानंतर आलेला अनुभव मांडत आहे. ओळख मात्र ऑनलाईन झालेली आणि ती होऊन सुद्धा 5 महिन्यांचा कालावधी झाला अन त्याचच रूपांतर विश्वासू आणि अतूट मैत्रीत केव्हा झालं हे काही कळलंच नाही. आजपर्यंत जेवढे जिवलग मित्र झाले आहेत त्यात तू एक.. स्पष्ट आणि सोज्वळ बोलणं, उत्तम मार्गदर्शक, स्वतःपेक्षा मित्रांची काळजी करणं, आपला एकही मित्र तुटू नये यासाठी धडपड करणं, चुकलो तिथे वाट दाखवण, गरज लागली तिथे मदत करणं, फारसं काही लिहणार नाही कारण तुझ्याबद्दल लिहायला गेलं तर शब्द कमी पडतील.
आणखी एक छोटासा अनुभव काही महिन्यांपूर्वी मी कोविड-१९ कोरोना वर २०२० एक दृष्ट वर्ष हा लेख लिहिला होता आणि सर्व मित्रमंडळींना पाठवला होता आणि त्यातल्या एका बालपणीच्या मित्राने पूर्ण वाचून प्रतिसाद म्हणून उत्तर जिमेल(GMail) वर पाठवलं होतं आणि त्यात प्रशंसा म्हणून खूप काही नाम, सर्वनाम, क्रियापद आणि विशेषणामांचा भयंकर रित्या मारा केला होता आणि मुख्य आकर्षण म्हणजे त्याने सुद्धा मराठीतच पाठवलं होतं. अशाच काही जिवलग मित्रांची साथ नेहमी रहावी एवढीच इच्छा....
कळत-नकळत अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपला मित्र आपल्यापासून लांब जातो आणि ति अतूट मैत्री तिथेच थांबल्यासारखी होते. एक घंटा न जाणारा मित्र आपल्याला कित्येक दिवस बोलत नाही ना आपल्याकडे बघतो कारण त्याला भास झालेला असतो आपल्या मित्राने आपलं मन दुखावलं आहे. कळत किंवा न कळत हाच जिवलग मित्र आपली माघारी बदनामी आणि वाईट गोष्टी सांगायला सुरवात करतो याचंच रूपांतर भांडणांमध्ये होतं. वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी सांगत असतात की विश्वासवरच सगळं जग कायम आहे परंतु त्या विश्वासाला जेव्हा तडा जातो तेव्हा ते नातं तुटायला सुरुवात होते. जाणूनबुजून एखाद्या मित्राला वाळीत किंवा एकट्यात टाकतात कारण काही जणांना त्याचा स्वभाव पटत नाही. आपल्यामुळे कुठल्याही मित्राचं मन दुखावलं जाईल असं वागू नका कारण मित्र म्हणजेच आपलं अर्ध आयुष्य असतं...
``बने चाहे दुश्मन ज़माना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा``
या वाक्याच्या अर्थाप्रमाणे प्रत्येक मित्राचं आपापल्या जिवलग मित्रांबद्दल प्रेम कायम राहो आणि हे अतूट नातं निरंतर रहावं एवढीच प्रार्थना....
~ केशव प्रदिपराव बडवे
:~ ९३०९९३४०३०
Comments