कोरोना बस करो ना ....

एक वर्षापेक्षा सुद्धा जास्त लोटला गेला असून अजूनही कोरोनाचा तांडव भारतात चालूच आहे. कधीही न विचारात आलेले शब्द आज अनुभवायला मिळत आहेत. अचानकपणे आलेलं महामारीचं संकट केव्हा टळेल हे काही सांगता येत नाहीये कारण जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील तज्ञ डॉक्टर तिसरी आणि चौथी लाट येईल हे सांगत आहेत आणि सध्या चालू असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे होत असलेला मृत्यूचा तांडव पाहता तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा हाहाकार काय असेल??

 बऱ्याच दिवसानंतर "कोरोना बस करो ना " हा लेख लिहीत आहे आणि लिहिण्याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा होत असलेला बाजार आणि त्याची दुरवस्था!!
 सध्याची परिस्थिती अजूनही पाहता अजूनही हाताबाहेर असल्याचं दृश्य डोळ्यासमोर उभं राहतं कारण प्रत्येक जण आपापल्या नातेवाईकांना वाचण्यासाठी जिवाचं रान करत आहे. काही महिन्यांपूर्वी रुग्णांची आकडेवारी थोडी फार कमी झाली होती मात्र ते कळताच नागरिकांनी निष्काळजीपणे बाहेर विना मास्क, सोशल डिस्टनसिंग आणि सॅनिटायझर वापरताच फिरायला सुरुवात केली आणि आता आपण पुन्हा त्याच वळणावर आहोत असं काहीसं अनुभवायला मिळत आहे. आपल्या देशातील लोकसंख्या आणि त्यानुसार असणारी आरोग्य व्यवस्था पाहता आपण खूप सुरक्षित आहोत हे मात्र अगदी खरं.

दैनंदिन टीव्हीवर,वर्तमानपत्रात, सोशल मीडियावर वाचायला येणाऱ्या बातम्या पाहून मनात अगदी भितीचं वातावरण निर्माण होतं आहे कारण प्रशासन किंवा राजकीय व्यक्ती वारंवार आणि बजावून सांगत आहेत की श्रद्धांजली चे मेसेज टाकू नका परंतु लोक ऐकत नाहीयेत याला उपाय काय?..नाही कुठंतरी आपण ऐकायला हवं कारण आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्याला धीर द्यायचं काम करायचं आहे नाहीतर मानसिक तणाव खूप त्रासदायक असतो हे आपल्यालाही माहीत आहे..

देशाची केंद्र आणि राज्य सरकार मिळून-मिसळून नागरिकांना वाचवण्याचं आणि त्यांचं आरोग्य उत्तम करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहे आणि त्याला आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी घरात राहून नियमांचं पालन करून साथ द्यायला हवी त्याशिवाय ते प्रयत्न यशस्वी होणार नाहीत.. भारताला स्वातंत्र्य मिळवून ७४ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी आपली आरोग्य व्यवस्था कमकुवत आहे हे स्पष्ट दिसत आहे याचं मुख्य कारण म्हणजे देशाचं राजकारण. प्रथमतः आपण कोरोना नावाचा रोग अशी भयंकर महामारी कधी अनुभवली नाहीये आणि अचानकपणे इतक्या प्रचंड प्रमाणात आरोग्य व्यवस्थेला उभं करणं अवघड जाणारच झालं..कुठल्याही क्षेत्रात काम करायचं झालं तर अडचणींचा सामना तर करावा लागणारच. खोळंबलेल्या आरोग्य क्षेत्रात सध्याच्या परिस्थितीत राज्य केंद्र आणि राज्य सरकार वेगळेच वक्तव्य करत आहे..ते कसं मुद्यावरून मांडतो..कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना श्वासाचा त्रास होत आहे तर कोविड सेंटर उभारायला लागणारा आर्थिक निधी, ऑक्सिजन पुरवठा, लॉकडाऊन संदर्भातील निर्णय आणि अनेक बाबतीत आरोप होतो आणि  केंद्राकडून पुरठवा होत नाही असा राज्य सरकारकडून आरोप होतो आणि केंद्र ते आरोप फेटाळून लावतं त्यात पिंजला जातो तो सामान्य माणूस!

आता स्पष्ट शब्दात मांडायचं झालं तर गेली काही महिने झालं अज्ञात मित्रांच्या मदतीने आम्ही कोविड फायटर्स हा ग्रुप सोशल मीडियावर काढला आणि त्या माध्यमातून आम्ही अल्पशा प्रकारात मदत सुरू केली त्यात मग  बेडची व्यवस्था करून देणं, व्हेंटिलेटर मिळवण्यासाठी मदत करणं, रेमडेसीविर इंजेक्शन कुठे मिळेल त्याचा पत्ता त्या औषध विक्रेत्याशी संपर्क करणं आणि ते मिळेपर्यंत फोन करणं किंवा शक्य झालं तर प्रत्यक्षात जाऊन मदत करणं आणि जवळपासच्या मोफत भोजन असलेल्या व्यक्तींशी संपर्क करून जेवणाची सोय करणं आणि अजूनही होईल त्या प्रकारे मदत आम्ही करत आहोत.

आपला देश एवढ्या मोठ्या संकटात असताना प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लुटत आहे..हो थोडं मोकळ्या पद्धतीनं सांगायचं झालं तर जवळपास पोलीस प्रशासन, किराणा दुकानदार ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत भरमसाठ लूट चालूच आहे मग त्यात दैनंदिन आवश्यक असलेल्या वस्तूंची किंमत वाढवणं, जाणूनबुजून जास्त पैसे घेणं, कोविडच्या विरुद्ध लढण्यासाठी लागणाऱ्या रेमडेसीविर आणि अँफोन्स इंजेक्शन्सचा काळा बाजार आणि तो खुल्या पद्धतीने चालवणं, लसींचा तुटवडा, पेट्रोल डिझेल चे भाव वाढ, ऍम्ब्युलन्सचे वाढीव दर आणि कित्येक गोष्टी मांडता येतील पण मुख्य मुद्दा महत्वाचा आहे. अनेक अडचणींवर शासनाने निर्बंध लावायला हवीत ज्याने करून रुग्ण संख्या रोखण्यास मदत होईल.

लवकरात लवकर लस तयार करून ती नागरिकांना मिळवून देण्याचं काम केंद्र आणि राज्य सरकार करत आहे परंतु काही समाजकंटक लसीकरणाच्या बाबतीत अफवा पसरवत आहेत. लस घेणं हे आपल्याच आरोग्यासाठी चांगलं आहे कारण त्यामुळे अँटिबॉडीज तयार होतात आणि कोरोनाच्या विष्णुपासून रक्षण करण्यात मदत करतात. प्रशासन विविध माध्यमातून लसीकरणाचा हेतू आणि त्याचा फायदा सांगण्याचं काम करत आहे परंतु नागरिकांमध्ये जनजागृती करणं ही आपली देखील जबाबदारी आहे.
 
अजूनही माणुसकी जिवंत आहे याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे सध्याच्या परिस्थितीत मोफत सेवा देणारे ऑटो रिक्षा चालक कारण कित्येक रुग्णांना ऍम्ब्युलन्स मिळत नाहीये आणि ते साध्य असलं तर पैसे नाहीयेत. छोट्या छोट्या व्यक्तींपासून ते मोठं मोठे उद्योजक सुद्धा आपला मदत कार्याला आपापल्या पद्धतीने हातभार लावत आहेत मग त्यात खूप जणांचं नाव घेता येईल जसं की सोनू सूद..खऱ्या आयुष्यात अभिनेता असावा तर असा..गेल्या वर्षापासून लागलेल्या लॉकडाऊन मुळे अडकून पडलेल्या नागरिकांना घरी पोहचविण्याच काम असो, रुग्णांना बेड व्हेंटिलेटर किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाची सोय करून देण अशी अनेक काम सध्या तो करत आहे, माझ्या देशाच्या अडचणीच्या काळात माझी सर्व संपत्ती दान करेल असं वक्तव्य करून कित्येक हजार कोटींची मदत करणं हे फक्त देशरत्न रतनजी टाटा च करू शकतात, विविध समाजसंस्था सुद्धा अनेक प्रकारच्या मदत करत आहेत आणि भरपूर जणांचं नाव घेता येईल पण हे लिहिणं पुरेसं नाही होणार. 

'वृक्षवल्ली आम्हा सोयरे'
हे ब्रीदवाक्य आता बदलत आहे कारण गावाचं शहरीकरण झालं त्यातून मोठं मोठ्या इमारती, रस्ते, घर, शाळा, महाविद्यालय आणि अनेक वस्तू बांधण्याचं काम आपण केलं पण त्यातुन केली जाणारी वृक्ष तोड याचा आपण कधीच विचार केला नाही. आता इतकी इतक्या हालाकीच्या परिस्थिती मध्ये ऑक्सिजन सुद्धा विकत घ्यावा लागतोय हे आपल्यासाठी दुर्दैवच!
होईल त्या ताकदीने दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना अचानकपणे तौक्ते चक्रीवादळ आपल्या समुद्र किनार पट्टीवर धडकन आणि तुफान नुकसान झेपणं हे खूप भयंकर होतं. कित्येक जिल्ह्यांमध्ये लाईट नाही, कुठे प्यायला पाण्याची अडचण, कोणाच्या घरात पाण्याचा शिरकाव होणं, अमाप झाड कोसळून पडण, मच्छीमारांची जहाज बुडणं, लाईटचे खांब कोसळल्यामुळे मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क तुटणं अशा अनेक अडचणी आपल्या समोर आल्या आणि त्यावरही मात करत केली. 

इतक्या सगळ्या अडनचणींचा सामना करून व त्यावर मात करून आपले कोविड योद्धे अजूनही ठामपणे उभे आहेत. खरे कोविड योद्धे म्हणजे लाईट नसताना आपल्यासाठी झटणारे कर्मचारी, आरोग्य व्यवस्थेतील फ्रंट लाईन कर्मचारी, पोलीस प्रशासन, रिक्षा चालक  अजून भरपूर काही आहेत त्यांच्या जिद्दीला सलाम आणि आपल्या देशाला संकटातून लवकरच मुक्त करतील हीच प्रार्थना...

वाचून आपलं मत नक्की कळवावे...🙏🏻



Comments

Popular posts from this blog

मी बाप्पा बोलतोय

तटस्थ!

ट्रेकिंग!