वारी चैतन्याची!!

वारी चैतन्याची..
वारी विठ्ठलाची..
वारी पंढरीची..
वारी भेटीच्या ओढीची...


    हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी आषाढी एकादशी हा एक मोठा सण होय. संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास महिन्याभरापूर्वीच या उत्सवाची तयार सुरू होते आणि हा उत्सव प्रत्येक भक्ताच्या मनात इतका रुजलेला आहे की लहान मुलापासून ते महाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा आपापल्या भक्तीने साजरा करतो कारण विठ्ठल हा साऱ्या जगाचा माय-बाप....

''जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ'' असं विठ्ठलास संबोधल्या जातं कारण संपूर्ण महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान आहे पंढरपूर आणि विठ्ठल. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूराच्या दिशेने पायी वाटचाल पालखीच्या माध्यमातून करत असतात मग त्यात लहान मुलं, युवक वर्ग, पुरुष आणि महिला आणि वृद्ध सुद्धा असतात हे काही नवल नाही. वारकऱ्यांना ओढ असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची, त्याच्या चरणाला स्पर्श करण्याची कारण प्रत्येक अडचणीचं मोक्ष तिथंच!

 पायी चालणं ते पण कुठल्याही गोष्टीच भान न ठेवता, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन हे प्रत्येकाच्या हाताचा खेळ नाही त्यासाठी लागते ती निस्सीम भक्ती आणि मनोभावी श्रद्धा. ऊन, वारा आणि तुफान पावसावर सुद्धा मात करत ही वारी पुढे चालत असते. पायी चालून पायाला पडणाऱ्या भेगा आणि त्या भेगांच्या वेदना विसरून पायी चालतच राहणं हे फक्त विठ्ठलाचा वारकरी करू शकतो. वारकरी सांप्रदाय म्हणलं की अभंग,टाळ, मृदंग, स्त्रियांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, पुरुषांचा टाळ खेळत खेळत नाच, पालखीच्या मुक्कामी फुगडी, माऊलींच्या अश्वांच रिगण, जेवणाची पंगत आणि भरपूर गोष्टी असतात त्याची मात्र मज्जा न्यारीच!

वारी चालत असताना कित्येक घाट लागतात आणि  वारीच्या वारकऱ्यांची छायाचित्रे आणि चित्रफीत काढण्यासाठी छायाचित्रकारांची देखील झुंबड उडालेली पाहायला मिळते कारण तो क्षण अद्वितीय व अविस्मरणीय असतो..

खरी वेळ आल्यावर कोणीच येत नसतं हे त्रिकालाबाधित सत्य आहे परंतु मदतीला धावून येतो तो भगवंत..तूच माझी आई देवा तूच माय-बाप, या वाक्यनुसार आपण कुठल्याही अडचणीत असलो की आठवण येते ती आपल्या आईबापाची आणि साऱ्या जगाचा माय-बाप म्हणजे भगवंत..इतकंच नाही तर देव आपला मित्र ही  असतो म्हणूनच आपण आपलं सुख दुःखं त्याच्याजवळ मांडतो आणि त्याचं समाधान ही तिथूनच मिळतं.गेली २ वर्ष आषाढी वारी आपल्या सर्वांना पहायला ही मिळाली नाही कारण कोरोनाचा प्रभाव जोरदार होता आणि आता कुठं तो हळू हळू सावरून आहे म्हणून यंदा आषाढीची न्यारी वेगळीच काहीशी हाय!

यंदा प्रत्येक आपल्या माय बाप विठ्ठलाला भेटायला खूप आतुरतेने पंढरीच्या दिशेने झेपावलेला आहे तरी त्या प्रत्येक निस्सीम भक्तास व्यवस्थित दर्शन लाभावं व विठुरायाच्या दर्शनाने मन तृप्त व्हावं हीच पांडुरंगाच्या चरणी साकडं आणि प्रार्थना....

इठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठलइठ्ठल
🚩🚩🚩🚩🚩🚩

अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या विठुरायाच्या श्री आषाढी एकादशी निमित्त मंगलमय शुभेच्छा!

टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संगं
देवाजीच्या दारी आज रंगला अभंग ॥


Comments

Popular posts from this blog

मी बाप्पा बोलतोय

तटस्थ!

ट्रेकिंग!