Posts

Showing posts from October, 2020

प्रवृत्ती..

Image
आपला देश किती सुंदर आहे हे इतर देशांच्या बाबतीत जर तुलना केली तरच कळेल हा लेख लिहायचा मुद्दा म्हणजे निरपराध मुलींवर होत असलेले 'बलात्कार'.. काही घटना घडल्या की लगेच टीव्हीवर असणारे बातम्यांचे प्रसार माध्यम, सोशल मीडियावर , वर्तमानपत्रात आणि अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळतात परंतु कोणतंही माध्यम एखाद्या कायद्याच्या विषयी बोलत नाही किंवा त्यांच्यावर तो प्रसंग घडला नाही म्हणुन असं करत असतील असं बोलु नये परंतु जेव्हा देशातील आई आणि बहिणींवर जेव्हा असं होतं हे पाहुन किंवा तो प्रसंग किती क्रूर असेल याचा नुसता विचार जर केला तर अंगावर शहारे येतात. एवढ्या  कठोर शब्दात लिहीत याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचुन खुप वाईट वाटलं आणि डोळ्यातून अश्रू सुद्धा आले. गेली कित्येक वर्ष झालं अशा गोष्टी घडत असतात परंतु जोपर्यंत एखादा कठोर कायदा नाही होणार तोपर्यंत असं कधी ना कधी कुठे ना कुठे घडत राहणारच.!                                ...