जयघोष चाले तुझा मोरया! 🙏🏻🚩


         अगदी लहान असताना आजीच्या आणि आईच्या गोष्टींच्या माध्यमातून परिचयात आलेला पहिला देव म्हणजे गणपती बाप्पा. याचं गोष्टींच्या माध्यमातून बाप्पा कधी आपल्या मनावर अधिराज्य गाजवून स्वतःची वेगळीच छाप सोडत प्रत्येक भक्ताच्या अडीअडचणीत पाठीशी कायम उभा असतो हे सर्वांना ठाऊक आहे.

गणेशोत्सवाची वाट अगदी  लहाण्यापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण आतुरतेनं पाहत असतो कारण गणरायाच्या आगमनाने मिळणारी स्फूर्ती, ऊर्जा ही कायम पाठबळ देत असते.

गणेशोत्सव म्हणलं की पहिलं नाव आठवतं ते मुंबई आणि नंतर पुणे. या सुरेख बाप्पांना पाहण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी पहायला मिळते. गणेशोत्सव सर्वच ठिकाणचे  पाहण्यासाखेचं असतात परंतु मुंबई आणि पुण्यातील गणेशोत्सवाची गोष्टच निराळी. भव्य-दिव्य फुलांची आरास, कमीतकमी 20 फुटांची बाप्पाची मूर्ती, बाप्पाच्या मूर्तीवर अप्रतिम दागिने, चहुबाजूस विद्युत रोषणाई, विशाल देखावा, कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि  मंडळात कार्यरत असलेले हजारो स्वयंसेवक ही बाब नवल करण्यासारखीचं!

मुंबई मधील मानाच्या गणपतींपैकी मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा हा पहिला येतो. इतर अनेक प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या गणपतींपैकी लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, तेजुकाया आण परेलचा राजा असे अनेक मंडळ येत असतात. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कमीतकमी ८ तासांचा अवधी लागतो कारण गर्दीचं त्या प्रमाणात असते. चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पाच्या दर्शनासाठी देखील त्याच प्रमाणात गर्दी होत असते. मानाच्या आणि नवसाला पावणाऱ्या बाप्पांच्या दर्शनासाठी असंख्य भक्तगण देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असावेत याचा अंदाज काढणं अशक्यचं!

जेव्हापासून या बाप्पांबद्दल माहीत आहे तेव्हापासून मुंबईला जाऊन यांच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत होतो पण त्याला काही मार्ग मिळत नव्हता पण यंदा ही इच्छा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुखरूप पूर्ण झाली....

अगदी गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत प्रत्येक जण आपापल्या घरच्या घरच्या आणि जवळपासच्या सार्वजनिक गणेशोत्सवात इतका तल्लीन होऊन गेलेला असतो की या १० दिवसांचा विसरच पडून जातो. हिचं प्रसन्नता कायम बाप्पाच्या आशीर्वादाने सर्वत्र नांदत राहो हेचं बाप्पाच्या चरणी साकडं!

!! निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, 
चुकले आमचे काही तर क्षमा असावी !!

अशी आर्त हाक देत साश्रूंयनांनी बाप्पाला निरोप दिला....

गणपती बाप्पा मोरया!
पुढच्या वर्षी लवकर या!

Comments

Popular posts from this blog

मी बाप्पा बोलतोय

तटस्थ!

ट्रेकिंग!