तटस्थ!
🚩
हजारो सुखा-दुःखांनी आयुष्य घडत असतं आणि हे सारं नियतीने अगोदरच ठरवलेलं असतं. माणूस संघर्षानेचं घडत असतो आणि ज्याला अपयश अथवा अडचणी नाही तो घडणार कसा..बरोबर ना..या साऱ्या गोष्टींवर मात करून स्वतःला सावरत अजून मजबूत बनवणं हे आपलं कर्तव्य आहे कारण घडलं नाही की पडलंच!
संघर्षाचं सर्वात मोठं उदाहरण जणू काय तर आजही हजारो वर्षांनंतर देखील तटस्थ असणारा सह्याद्री!
पहायला गेलं तर डोंगर आणि दरी हे निर्जीव आहेत पण यांनी जे सहन केलं ते करायची धमक आणि विचार करण्याची क्षमता सुद्धा कोणाकडेही असेल असं खडकावून सांगू शकतो..
साक्षात महादेवाचं रूप श्रीमंत छत्रपती श्री. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे पाऊलं पडलेली पावनभूमी, देवीदेवतांची जयघोष, गडगंज तोफा, लाखो मावळ्यांच्या आणि शत्रूंच्या रक्तरंजित लढाईनंतर पडलेला रक्ताचा सडा, अश्रूंचा पूर आणि बरंच काही...
एवढं काही होऊनही हा सह्याद्री अजूनही तटस्थ उभा आहे आणि यामुळेच स्वराज्य आणि महाराष्ट्र घडला आहे....🚩❤️
असंच काहीसं आपणही घडावं...!
Comments