वारी चैतन्याची!!
वारी चैतन्याची.. वारी विठ्ठलाची.. वारी पंढरीची.. वारी भेटीच्या ओढीची... हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी आषाढी एकादशी हा एक मोठा सण होय. संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास महिन्याभरापूर्वीच या उत्सवाची तयार सुरू होते आणि हा उत्सव प्रत्येक भक्ताच्या मनात इतका रुजलेला आहे की लहान मुलापासून ते महाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण हा आपापल्या भक्तीने साजरा करतो कारण विठ्ठल हा साऱ्या जगाचा माय-बाप.... ''जगण्याचा पाया आणि चालण्याचे बळ'' असं विठ्ठलास संबोधल्या जातं कारण संपूर्ण महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान आहे पंढरपूर आणि विठ्ठल. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूराच्या दिशेने पायी वाटचाल पालखीच्या माध्यमातून करत असतात मग त्यात लहान मुलं, युवक वर्ग, पुरुष आणि महिला आणि वृद्ध सुद्धा असतात हे काही नवल नाही. वारकऱ्यांना ओढ असते ती विठ्ठलाच्या दर्शनाची, त्याच्या चरणाला स्पर्श करण्याची कारण प्रत्येक अडचणीचं मोक्ष तिथंच! पायी चालणं ते पण कुठल्याही गोष्टीच भान न ठेवता, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन हे प्रत्येकाच्या हाताचा खेळ नाही त्यासाठी लागते ती निस्सीम भक्ती आणि मनोभावी श्र...