पर्व आनंदाचं...
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...। हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली. दिव्यांचा प्रकाश, आकर्षक रांगोळी, नवे सदरे, सर्वत्र आनंद , चेहऱ्यावर स्मितहास्य, घरोघरी फरळांची मेजवानी असं काहीसं स्वरूप. दरवर्षीप्रमाणे होणारा बदल पाहता सण साजरा करण्याचा उत्साह काही प्रमाणात कमी झालं आहे. नातेवाईकांच्या, मित्रांच्या, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्याची मज्जाच वेगळी. घरात लहानसा आणि आकर्षक असा आकाशदिवा त्यात चमकणारे तारे आणि त्याला पाहत असताना मात्र असं वाटतं की यांच्याकडे पाहतच रहावं. रोज नवीन प्रकारची रांगोळी त्यात विविध रंगांनी केलेल्या कलाकृती आणि त्यावर एक दिवा म्हणजे रांगोळीवर नजर पडताच एखादं तरी छायाचित्र काढण्याची इच्छा व्हावी. दीपावली हा सण हिवाळ्यात असल्यामुळे थंडी मात्र जोरदार असते आणि त्यात पहाटेची अभ्यंगस्नान.. म्हणजे ना गरम पाण्याने स्नान आणि पहाटेच्या गाण्यांची रंगत न्यारी असं काहीच चित्र पहायला मिळतं. लहान मुलांना फटाक्याचं आकर्षण असतं कारण ती एक वेगळी गं...