Posts

Showing posts from September, 2020

ऑनलाईन शिक्षण..

Image
ऑनलाईन शिक्षण.. आपल्याला हवे किंवा नको असले तरी खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. काही गोष्टी आधीपासूनच आपली जागा बनवण्याच्या प्रयत्नात होत्या आणि लॉकडाऊनमुळे ती संधी मिळाली. आता सर्वजण या गोष्टींकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहू लागले आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 'ऑनलाइन शिक्षण' ! भारतात जसा लॉकडाऊन हा शब्द नवीन होता तसच ऑनलाईन शिक्षण हा काही प्रमाणात नवीनच होता.  शाळेत असुन शिकणं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाद्वारे शिकवण यात खुप मोठा बदल पहायला आणि अनुभवायला मिळतो. मुळात समक्ष शिकवलेलं विद्यार्थ्यांच्या डोक्यावर चांगला प्रभाव पडतो याचं मुख्य कारण म्हणजे शिकवताना लिहुन घेतलेल्या बारीक बारीक गोष्टी.                कॅमेऱ्यासमोर शिकवायचे झाले तर वर्गाशी जो संवाद व्हायला हवा तो होणार नाही आणि 'कन्टेन्ट डिलिव्हरी' तेवढी परिणामकारक होईल की नाही याबद्दलही शंका आहे. वर्गात शिकवताना सुद्धा सगळ्या मुलांना सगळे समजते असे नाहीच उलट लेक्चर व्हिडिओच्या स्वरुपात असेल तर मुले पाहिजे त्या वेळी, कितीही वेळा बघू शकतात, जे वर्गात शक्य नाही. भारतात फक्त निम...

२०२० एक दृष्ट वर्ष..!

Image
न भूतो व भविष्यती नसावं अस हे वर्ष. सर्वत्र कोविड-१९ चा थरथराट होता. एक विषाणू काय करू शकतो याचा भयंकर परिणाम  दिसु लागला आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. सर्वात प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. अगोदर काही लहानशे देश संक्रमित झाले त्यानंतर हळूहळू सर्वत्र पसरायला लागला. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लवकर पसरलं ही भिती होती व त्याप्रमाणेच घडलं.     २०२० च्या सुरुवातीला म्हणजेच ३० जानेवारी ला कोविड-१९ चा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळुन आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा...