Posts

Showing posts from January, 2021

नातं मित्रत्वाचं

Image
...मी आहे ना या उद्गाराच्या सुरुवातीपासून विश्वासाच्या एका वेगळ्याच नात्याची सुरुवात होते. वाचक रसिकांना आणि मित्रांना नक्कीच प्रश्न पडला असेल की नवीन लेख आहे तरी काय आणि त्याचा विषय काय? हो याचं उत्तर म्हणजे नातं मित्रत्वाचं आणि लिहण्याचा कारण म्हणजे विश्वासाने आणि आपुलकीने तयार झालेलं नातं म्हणजे मित्र.... चला मग आता मुख्य मुद्दा लिहायला सुरुवात करू.. आपण जन्माला येतो आणि आपल्या परिवारात मोठे होतो वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घडत जातो त्याचप्रमाणे मित्रांच्या सानिध्यात सुद्धा घडत असतो. आता हे मित्र होतात कशे ? हो सांगतो बालपणी शाळेत गेल्यानंतर कुठलाही मुलगा किंवा मुलगी आपल्या ओळखीचे नसते हळू-हळू गप्पा-गोष्टी रंगल्यानंतर आपण त्यांना आपलं मानायला लागतो आणि तोच अज्ञात मुलगा आपला मित्र होतो. आता शिक्षणाचा नवीन टप्पा येतो तो म्हणजे शाळा. शाळेत गेल्यानंतर सुद्धा अनेक अज्ञात मुलं मित्र बनतात आणि काही दिवसांच्या सोबतीनंतर अत्यंत विश्वासू आणि जिगरी यार होतात. अशाच काही मित्रांची मिळून टोळी (गॅंग) तयार होते आणि कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडणार नाहीत अशी वचने एकम...