पर्व आनंदाचं...
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्रयंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...।
हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली. दिव्यांचा प्रकाश, आकर्षक रांगोळी, नवे सदरे,
सर्वत्र आनंद , चेहऱ्यावर स्मितहास्य, घरोघरी फरळांची मेजवानी असं काहीसं स्वरूप. दरवर्षीप्रमाणे होणारा बदल पाहता सण साजरा करण्याचा उत्साह काही प्रमाणात कमी झालं आहे. नातेवाईकांच्या, मित्रांच्या, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्याची मज्जाच वेगळी. घरात लहानसा आणि आकर्षक असा आकाशदिवा त्यात चमकणारे तारे आणि त्याला पाहत असताना मात्र असं वाटतं की यांच्याकडे पाहतच रहावं. रोज नवीन प्रकारची रांगोळी त्यात विविध रंगांनी केलेल्या कलाकृती आणि त्यावर एक दिवा म्हणजे रांगोळीवर नजर पडताच एखादं तरी छायाचित्र काढण्याची इच्छा व्हावी. दीपावली हा सण हिवाळ्यात असल्यामुळे थंडी मात्र जोरदार असते आणि त्यात पहाटेची अभ्यंगस्नान.. म्हणजे ना गरम पाण्याने स्नान आणि पहाटेच्या गाण्यांची रंगत न्यारी असं काहीच चित्र पहायला मिळतं. लहान मुलांना फटाक्याचं आकर्षण असतं कारण ती एक वेगळी गंमतच आहे. घरात विविध प्रकारच्या फरळांची मेजवानी तयारच असते मग त्यात चिवडा, चकली, शंकरपाळे, बुंदी मग ती गोड असो अथवा तिखट,लाडू, गुलाबजाम आणखी बरंच काही असतं पण ते लिहायला गेलं तर आत्ताच तोंडाला पाणी सुटायला येत आहे. मग आता रोज नवीन सण असतो त्यात वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज करून दिवाळी साजरा केली जाते.
वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. राक्षसांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवाराणास समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे म्हणून धन्वंतरीची पूजा केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते यालाच नरकचतुर्दशी असे म्हणतात. नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बली आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी गोवर्धन पूजाही करतात. या दिवसापासून विक्रमसंवत्सराचा प्रारंभ होत असल्याने व्यापार्यांचे नवे वर्षही देखील याच दिवशी सुरू होते.पाडवा हा साडेतीन लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी हा एक मुहूर्त आहे. कार्तिक शुद्ध द्वितीया भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. त्यामागील कारण म्हणजे या दिवशी यम आपल्या बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.बहिणीने लाडक्या भावाला भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी. त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. दिवाळीच्या तयारीत मग्न होऊन जो आनंद पहायला मिळतो तो क्वचितच पहायला मिळत असेल..
अशा स्वरूपात सण साजरे करून दीपावली हा उत्सव साजरा केला जातो..
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, याच आमच्या सदिच्छा आणि आमच्याकडुन तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.!
केशव प्रदिपराव बडवे
९३०९९३४०३०
परळी वैजनाथ
Comments