प्रवृत्ती..
आपला देश किती सुंदर आहे हे इतर देशांच्या बाबतीत जर तुलना केली तरच कळेल हा लेख लिहायचा मुद्दा म्हणजे निरपराध मुलींवर होत असलेले 'बलात्कार'..
काही घटना घडल्या की लगेच टीव्हीवर असणारे बातम्यांचे प्रसार माध्यम, सोशल मीडियावर , वर्तमानपत्रात आणि अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळतात परंतु कोणतंही माध्यम एखाद्या कायद्याच्या विषयी बोलत नाही किंवा त्यांच्यावर तो प्रसंग घडला नाही म्हणुन असं करत असतील असं बोलु नये परंतु जेव्हा देशातील आई आणि बहिणींवर जेव्हा असं होतं हे पाहुन किंवा तो प्रसंग किती क्रूर असेल याचा नुसता विचार जर केला तर अंगावर शहारे येतात. एवढ्या कठोर शब्दात लिहीत याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलात्काराची बातमी वाचुन खुप वाईट वाटलं आणि डोळ्यातून अश्रू सुद्धा आले. गेली कित्येक वर्ष झालं अशा गोष्टी घडत असतात परंतु जोपर्यंत एखादा कठोर कायदा नाही होणार तोपर्यंत असं कधी ना कधी कुठे ना कुठे घडत राहणारच.!
खुप दिवस झालं समाजात वावरताना अनेक प्रकारच्या व्यक्तींचे विविध विचार ऐकायला आणि पहायला मिळाले. काही चांगले तर काही वाईट विचारांचे लोक असतात. देवाने एवढं सुंदर "आयुष्याचं " वरदान दिलं आहे तर त्याचा सदुपयोग करणं आपल्या हातात असतं परंतु काही नीच प्रवृत्तीचे राक्षस समाजात वावरताना एखाद्या मुलीवर क्रूरतेने अत्याचार करतात कारण त्यांना त्यांची गरज भागवायची असते पण अशा नराधमांना एखाद्या वेळेस जिवंत जाळलं तर पुन्हा असं करायचं कोणत्याही नीच प्रवृत्तीच्या राक्षसाच्या मनात विचार सुद्धा येणार नाही.
प्रत्येकाला वाटतं की आपली आजी आई,बहीण,काकु,मावशी,आत्या,असाव्यात परंतु जर बलात्कार होत राहिले तर अनेक जण "अनाथ" राहतील. आपलं कोणीतरी असावं पण ज्यांचं कोणीही नसतं म्हणजे जे मुलं अनाथ आहेत त्यांना आयुष्यात एकदा नक्की विचारा की "तुला आई किंवा बहीण नाहीये तर कस वाटतं ?"
आपल्या देशात लोकशाही आहे म्हणुन अनेक पक्षांचं सरकार येत आणि कार्यकाळ संपवून निघूनही जातं परंतु कुठल्याही पक्षाचं सरकार मुलींच्या बाबतीत एखादा कठोर कायदा करत नाही किंवा त्याबाबतीत फक्त सांत्वन आणि राजकारण केलं जातं पण एकाही व्यक्तीच्या मनात येत नाही की ज्या व्यक्तीसोबत तो प्रसंग घडतो तेव्हा त्याला काय वाटलं असेल ?
काही महिन्यांपूर्वी हैद्राबाद येथील प्रियंका रेड्डी नावाच्या डॉक्टरवर यापेक्षा सुद्धा क्रूर प्रसंग घडला होता. त्यात त्यांचं अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्यानंतर त्यांना जिवंत पेटवलं होत. हैद्राबाद पोलिसांनी एका चकमकीत त्या अपराध्यांना ठार करून त्या निरपराध डॉ. प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळवून दिला पण जर हे प्रकरण झालं नसत तर देशातील एक डॉक्टर या कोरोनाच्या कठीण काळात आपलं कर्तव्य बजावत राहिला असता परंतु ते आपलं दुर्दैव. या प्रकरणाला अजुन वर्ष सुद्धा झालं नाही अन लगेच आणखी एका मुलीसोबत असं घडतं म्हणजे माणसातला राक्षसीपणा जिवंत आहे हे धडधड स्पष्ट होतं पण कुठतरी या गोष्टीला आळा घालायला हवा नाहीतर अनेक निरपराध मुलींवर असेच अत्याचार होत राहतील. मनात कुठतरी खंत निर्माण होते की आपण एक पुरुष आहोत कारण अपराध करणारे पुरुषच आहेत. दैनंदिन गरजा भागवत असताना आता एक मुलगी सुद्धा मुख्य गरज झाली आहे असं पहायला मिळत कारण ती गरज म्हणजे एक प्रकारची ट्रेंड झाली आहे. लहानात लहान मुलाला सुद्धा वाटतं की आपली गर्लफ्रेंड असावी पण हे वाईट आहे यांना सांगणार कोण ? जी व्यक्ती समाजविण्याचा प्रयत्न करते त्याला ही मुलं एकतर मूर्खात किंवा वेड्यात काढतात. काही प्रमाणात घरच्यांचा धाक असतो पण बाहेर फिरताना त्या भीतीचा विसर झालेला असतो.
आता काही महत्वाच्या मुद्द्यांची मांडणी करतो त्यात प्रामुख्याने:-
१) दुबईमध्ये बलात्कार करणाऱ्या अपराध्यांना जी शिक्षा दिली जाते त्याप्रमाणे जर भारतात दिली तर नक्कीच गुन्हेगारी कमी होईल.
२) अशा गुन्हेगारांना लवकर शिक्षा व्हावी म्हणून फास्ट ट्रक न्यायालय स्थापन करावीत आणि ती करण्यासाठी आपण सरकारला भाग पाडाव.
३) अपराध करणारा कुठल्याही धर्माचा असो त्याला शिक्षा लवकरात लवकर व्हावी आणि त्याची प्रसिद्धी सर्वत्र करावी म्हणजे नंतर कोणी करण्याचा विचारही करणार नाही.
४) जो कायदा सरकार करणार आहे तो कुठलही सरकार बरखास्त करू शकणार नाही कारण अनेक पक्षाचं सरकार निवडून येतं आणि आपला कार्यकाळ संपवून जातं.
५) मुलींसाठी पोलीस प्रशासनात अनेक पथक आहेत पण त्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी.
हा मुद्दा मांडताना एक लाजिरवाणी बातमी ऐकायला मिळाली की सध्या आय.पी.एल. चालु आहे आणि त्यात काल चेन्नई सुपर किंग्स या संघाचा सामना कोलकत्ता नाईट रायडर्स सोबत होता तर त्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स या संघाचा पराभव झाला तर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या ५ वर्षांच्या मुलीला बलात्कार करण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली. अरे नालायकांनो तुम्हाला तुमच्या आई-बहिणीला सांभाळता येत नसेल तर किमान दुसऱ्यांच्या मुलींबाबतीत असं नका बोलु आणि एवढीच जर हौस असेल तर स्वतःच्या बहिणीसोबत करा.
सोशल मीडियावर एक वाक्य नेहमी वाचायला मिळत की जोपर्यंत एखाद्या मोठ्या पुढाऱ्याच्या मुलीवर बलात्कार होणार नाही तोपर्यंत कायदा अंमलात नाही येणार. मी कोणत्याही मुलीचं वाईट चिंतत नाही पण काही गोष्टी असं बोलायला भाग पडतात. प्रत्येकाला बहीण आहे जी आपली आई सोबत नसताना तिच्यापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करते पण असंच घडत राहिलं तर ना कोणाला बहीण असणार ना आई. आपल्या देशाच्या हजारो वर्षांच्या प्राचीन आणि संस्कृती असणाऱ्या इतिहासाला एका क्षणातच काळिमा फासली जाती ना तेव्हा काय वाटतं ते मी या शब्दांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे तरी काही चुकलं असेल तर माफी असावी.!
टीप:- माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नाहीये जरी नकळत दुखावल्या असतील तरी आपण मोठ्या मनाने माफ कराल हीच अपेक्षा.!
~ अद्वितीय_लेखन.!
केशव प्रदिपराव बडवे
:~ ९३०९९३४०३०
Comments