ऑनलाईन शिक्षण..

ऑनलाईन शिक्षण..

आपल्याला हवे किंवा नको असले तरी खूप मोठे बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. काही गोष्टी आधीपासूनच आपली जागा बनवण्याच्या प्रयत्नात होत्या आणि लॉकडाऊनमुळे ती संधी मिळाली. आता सर्वजण या गोष्टींकडे एक उत्तम पर्याय म्हणून पाहू लागले आहोत. त्यापैकीच एक म्हणजे 'ऑनलाइन शिक्षण' !
भारतात जसा लॉकडाऊन हा शब्द नवीन होता तसच ऑनलाईन शिक्षण हा काही प्रमाणात नवीनच होता. 
शाळेत असुन शिकणं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माध्यमाद्वारे शिकवण यात खुप मोठा बदल पहायला आणि अनुभवायला मिळतो. मुळात समक्ष शिकवलेलं विद्यार्थ्यांच्या डोक्यावर चांगला प्रभाव पडतो याचं मुख्य कारण म्हणजे शिकवताना लिहुन घेतलेल्या बारीक बारीक गोष्टी.
               कॅमेऱ्यासमोर शिकवायचे झाले तर वर्गाशी जो संवाद व्हायला हवा तो होणार नाही आणि 'कन्टेन्ट डिलिव्हरी' तेवढी परिणामकारक होईल की नाही याबद्दलही शंका आहे. वर्गात शिकवताना सुद्धा सगळ्या मुलांना सगळे समजते असे नाहीच उलट लेक्चर व्हिडिओच्या स्वरुपात असेल तर मुले पाहिजे त्या वेळी, कितीही वेळा बघू शकतात, जे वर्गात शक्य नाही. भारतात फक्त निम्म्या घरातच इंटरनेट आहे, सर्व विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप स्मार्टफोन असेलच असे नाही, मग ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात करण्याची आता गरज आहे का?  असा प्रश्न निश्चितपणे विचारला जाईल. ऑनलाइन शिक्षण घेताना विद्यार्थी लक्ष देऊन शिकतील का? आणि तसे नसेल तर कशाला हवे ऑनलाइन शिक्षण?  देशाची अर्थव्यवस्था नाजूक स्थितीत असताना लोकांकडे जगायला पैसे नाहीत आणि शाळांना किंवा विद्यापीठांना ऑनलाइन शिक्षण हवं आहे ?

बाहेर पडणे तितकेसे सुरक्षित नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला व त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाची गरज भागवण्यासाठी असलेल्या आवश्यक असलेल्या साधनांची मागणी सुद्धा वाढली. 
ऑनलाईन शिक्षणाच्या योग्य अंमलबजावणीने थेट प्रसारणाच्या माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या शिक्षण घेऊ शकतात. हे दोन माध्यमाद्वारे होऊ शकते. आधीच रेकॉर्ड केलेली व्हिडिओची बँक विद्यार्थ्यांना मदत करू शकते व जसे प्रत्यक्ष वर्गात शिक्षक शिकवतात त्याच प्रमाणे ऑनलाइन माध्यमातून शिक्षण घेणे शक्य आहे. Google Meet, Zoom, Cisco Webex, Microsoft Teams अशी सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. दरमहा फक्त दोन हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत एकावेळी शंभर विद्यार्थीलाईव्ह लेक्चर ऐकू शकतील अशी सोय यामध्ये आहे.  उत्तम शिकवू शकणारे शिक्षक याद्वारे आपला व्यवसाय वाढवू शकतात व विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा होईल. ऑनलाईन शिक्षणामुळे कॉम्पुटर, लॅपटॉप, टॅबलेट,स्मार्टफोन,इंटरनेट इ. तांत्रिक वस्तु हाताळण्याचं ज्ञान विद्यार्थ्यांना आले असुन याचा वापर ते आपल्या दैनंदिन जीवनात देखील करत आहेत. जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटे सुद्धा आहेत. उत्तम दर्जाचे इंटरनेट उपलब्ध नाही, मोबाईल उपलब्ध नाहीयेत, मोबाईल फोनवर सतत लेक्चर ऐकल्यामुळे व पाहिल्यामुळे डोळ्यांना व कानांना त्रास होतो. मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. अशा अनेक अडचणींना सामोरी जावं लागत. पालकवर्ग आणि मुले २४ तास ऑनलाईन असल्यामुळे काही वेळेस वाद सुद्धा निर्माण होतो. घरी बसुन शिक्षण असल्यामुळे मुलांमध्ये आळशी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. सकाळी लवकर उठण्याची सवय बंद झाली आहे.

सर्वात मोठा तोटा म्हणजे इंटरनेटचा गैरवापर सुद्धा होत आहे. क्लास चालू असताना मित्र मैत्रिणींना चॅटिंग करणे,गेम खेळणे, विडिओ बघणे अशा अनेक गोष्टी घडत आहेत.जर ऑनलाईन शिक्षण एका वर्गात असलं असत तर एकमेकांशी संवाद, मदतीची भावना आणि  मिळून मिसळून राहण्याची भावना निर्माण होते. ऑनलाईन क्लास सुरू असताना विद्यार्थी वर्गाची उपस्थिती खुप कमी असते कारण काही विद्यार्थी करत नाहीत, काही आपला वेळ घालवण्यासाठी करतात, काही लक्ष देऊन आपल्याला ज्ञान प्राप्त करतात, काही शिक्षकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात अशा अनेक विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षकांना क्लास घ्यावा लागतो.सध्या काही प्रमाणात सोपं तर काही प्रमाणात अडचणींचा सामना करत ऑनलाईन शिक्षण चालु आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना समक्ष असुन शिकवलेलं कळत नाही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवलेलं काय कळणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे..

ऑनलाईन शिक्षण चालु असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध नाहीयेत त्यांच जे नुकसान झालं आहे त्याकडे शासनाने लक्ष द्यायला हवं. कोविड-१९ मुळे अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळून इतर सर्व शासनाने पास केलेले आहेत परंतु आता पुन्हा अजुन परीक्षांचा कालावधी आलेला आहे याकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यायला हवं आहे. सध्याची परिस्थिती पाहता या वर्षी दिवाळीनंतरच शाळा आणि महाविद्यालये सुरू होतील असं वाटत आहे तोपर्यंत ऑनलाईन शिक्षण चालू राहणार किंवा नाही हा मुख्य मुद्दा आहे.

केशव प्रदिपराव बडवे
९३०९९३४०३०
परळी वैजनाथ

Comments

Popular posts from this blog

मी बाप्पा बोलतोय

तटस्थ!

ट्रेकिंग!