२०२० एक दृष्ट वर्ष..!
न भूतो व भविष्यती नसावं अस हे वर्ष. सर्वत्र कोविड-१९ चा थरथराट होता. एक विषाणू काय करू शकतो याचा भयंकर परिणाम दिसु लागला आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. सर्वात प्रभावित होणारा महत्त्वाचा अवयवाचा सहभाग म्हणजे फुफ्फुसांचा आणि त्यानंतर आतडे. पारंपारिकपणे हे संक्रमण अशा लोकांवर परिणाम करतात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, तरीही हे संक्रमण आजार नसलेल्या तरुण व्यक्तींवर देखील परिणाम करीत आहे. अगोदर काही लहानशे देश संक्रमित झाले त्यानंतर हळूहळू सर्वत्र पसरायला लागला. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लवकर पसरलं ही भिती होती व त्याप्रमाणेच घडलं.
२०२० च्या सुरुवातीला म्हणजेच ३० जानेवारी ला कोविड-१९ चा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळुन आला. त्यानंतर गेल्या चार महिन्यांत या आजाराच्या रुग्णांचा आकडा एक लाखापार गेला. याचा अर्थ, रोज सरासरी ९०० नवे रुग्ण नोंदविण्यात आले. काही पाश्चात्य देशांमध्ये साथीच्या पहिल्या टप्प्यात रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. काही दिवस काहीच नाही वाटलं जस जस या विषाणूचा प्रसार झाला तस तस परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. एका छोट्याश्या विषाणूने साऱ्या भारताची झोपच उडवुन लावली. भारत हा दवाखान्यांच्या बाबतीत खुप कमी प्रगत झालेला नाही याचा फायदा विषाणू ला त्याचा प्रादुर्भाव वाढवण्यासाठी उपयोगी ठरणार होता. संपुर्ण भारतात कोरोना पसरला होता आता मात्र परिस्थिती चिंताजनक झाली होती.कोरोना हा रोग माणसांच्या स्पर्शाने पसरणारा होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 22 मार्च रोजी एक दिवसाचं लॉकडाऊन जाहीर केलं. दैनंदिन काम करणाऱ्या लोकांना एक दिवस घरी राहिलं तर जीव तडफड झाला होता पण हा विषाणू खुप भयंकर होता म्हणुन लॉकडाऊन करावं लागलं. देशाच्या नागरिकांना वाचवायचं जर असेल तर एकमेव लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय होता. लॉकडाऊनचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लाभ अधोरेखित होतात; परंतु हानीकडे दुर्लक्ष होते. त्याहीपेक्षा दुर्दैवी म्हणजे, लाभांविषयी अनिश्चितता आहे, एवढेच काय खरेच लाभ झाले आहेत का, अशी शंका होती.. लॉकडाऊन करण्याची तीन प्रमुख उद्दिष्ट्ये होती. पहिले उद्दिष्ट म्हणजे, विषाणूची साखळी तोडणे. साखळी तोडली, तर विषाणूचे पेशीविभाजन रोखले जाईल. दुसरे म्हणजे, बाधित व्यक्तिंमध्ये वाढ झाली, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तयारी करायला आरोग्य यंत्रणेला अवधी मिळेल आणि तिसरे उद्दिष्ट म्हणजे, मानवी वर्तणुकीवर काम करणे. याचा अर्थ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना हात धुवणे, मास्क घालणे आणि सुरक्षित वावराचे नियम पाळण्याची सवय लावणे.
पहिला लॉकडाऊन - 24 मार्च ते 14 एप्रिल
अचानक २२ मार्चच्या रात्री पाहिल्या लॉकडाऊनची घोषणा झाली.पहिला लॉकडाऊन - 24 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीपर्यंत राहणार हे घोषित करण्यात आलं. भारतात लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमणाचा वेग कमी करण्यात तात्पुरते यश मिळाले; परंतु मोठ्या प्रमाणात संसर्ग रोखण्यात लॉकडाऊन अपयशी ठरले आहे. अत्यावश्यक सेवा जशा की दवाखाने , मेडिकल व इतर काही सेवा सुरू राहतील बाकी मात्र कडक बंदच. लोकांना घरी राहण्याची सवय नव्हती परंतु जीवाला धोका आहे या भीतीने घरीच राहु लागले. एप्रिल अखेरीपर्यंत म्हणजे ३० दिवसांत रुग्णांच्या संख्येत ८० पटीने आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १०८ पटीने वाढ झाली. याचप्रमाणे १२ मे पर्यंत संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत १७८ पटीने आणि मृत्यूंच्या संख्येत २४१ पटीने वाढ झाली. ही आकडेवारी पाहता, सध्याच्या स्वरूपातील लॉकडाऊन आणखी काही दिवस कायम राहिला, तर जूनच्या अखेरीपर्यंत रुग्णसंख्या सुमारे साडेपाच लाखांवर आणि मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १८ हजारांवर पोहोचू शकते हा अंदाज वर्तविण्यात आला होता. सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे होणाऱ्या भेटीगाठींमधून विषाणूच्या फैलावाला चालना मिळते. मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याचा धोकाही निर्माण होतो; परंतु निष्क्रियता आणि विलगीकरणामुळे लोकांची आर्थिकदृष्ट्या जगण्याची क्षमता संपते. दीर्घकालीन विचार केला, तर विशेषतः गरीबांचा एक तर संसर्गामुळे मृत्यू होतो अथवा भुकेने.
दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे
दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये पण परिस्थिती बिघडू लागली. जवळपास सगळ्याच राज्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. देशाचे पंतप्रधान ते गावातील ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंत सगळेच लॉकडाऊनमुळे देशभरात विविध राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित कामगार, विद्यार्थ्यी आणि पर्यटकांच्या दृष्टीने केंद्राने मोठा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या या सर्वांना आता आपापल्या घरी जाता येणार असून, याबाबत गृहमंत्रालयाने यापूर्वीच आदेश जारी केला झाले होते.
दुसरा लॉकडाऊन सुद्धा संपत येणार होता की केंद्र सरकारने काही नियमावली जाहीर केल्या. असून, अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणे गरजेचे आहे, जी व्यक्ती प्रवासात जाणार आहे, त्या व्यक्तिचे स्क्रिनिंग केले जावे. तसेच ज्या लोकांमध्ये कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणं नाहीत, अशाच लोकांना प्रवासाची परवानगी दिली जाणार अस या नियमावलीत नमुद करणयात आलं आहे.
तिसरा लॉकडाऊन - 3 मे ते 17 मे
देशातील कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन देशात लागु आहे. देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आले आहे. आता लॉकडाऊन देशात 17 मे पर्यंत सुरू राहणार आहे वास्तविक हा लॉकडाउन 3 मे रोजी संपणार होता.
तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन मध्ये थोडीशी सवलत दिली असली तरी सूट लक्षात घेता ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई-कॉमर्सला मान्यता देण्यात आली आहे. ग्रीन झोनमध्ये 50 टक्के राईडशिपसह बसेस चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नव्या सूटमुळे आणखी २५ लाख दुकाने सुरू होण्याची आशा आहे. मोठ्या कंपन्यांना पुरवठा करणाऱ्या ३० ते ३५% कंपन्या व स्वत:चे उत्पादन करणारे १० ते १५ टक्के उद्याेग सुरू होतील.
सुमारे १० ते १५% उद्योग उत्पादन सुरू करू शकतील. बहुतांशी ठिकाणांवर मजूर नसल्याने आणि कच्चा मालाच्या अभावात मोठे उद्योग हळूहळू उघडणे सुरू होईल. अशा काही सवलती देत केंद्र शासनाने थोडं फार व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली.
चौथा लॉकडाऊन 18 मे ते 31 मे
राज्यातील आरोग्यस्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी आपापल्या रितीने मुकाबला करीत आहे. चौथ्या लॉकडाऊनच्या काळात सुद्धा अनेक समस्यांना तोंड द्यावं ही मुख्य बाब होती. गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या गाईडलाईनुसार काय सुरू काय बंद याची यादी जाहीर करण्यात आली त्यानुसार
हॉटेल बंद राहणार, होम डिलिव्हरीची परवानगी. सर्व विमान सेवा बंद राहणार. मेट्रो सेवा बंद.मॉल, सिनेमागृह, जीम बंदच राहणार. 31 मेपर्यंत सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी. ग्रीन झोन असणाऱ्या त्याच राज्यात बस, टॅक्सी चालविण्याची परवानगी. स्टेडियम, क्रीडा संकुल उघडणार, परंतु प्रेक्षकांना परवानगी नाही. राज्यांच्या संमतीने आंतरजिल्हा बस सेवा सुरु. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी. शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार.
पाचवा लॉकडाऊन अजुनही चालु आहे.
लॉकडाऊन - 5 असून याला 'मिशन बिगीन अगेन' असं म्हणत या नवीन लॉकडाऊनसंदर्भातील नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मेट्रो रेल्वे, शाळा-महाविद्यालये, सिनेमागृहे बंद राहणार आहेत. केंद्राने परवानगी दिली असली तरी धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत.
'मिशन बिगीन अगेन' चा पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा अनुक्रमे 3 जून आणि 5 जूनपासून सुरू झाले आहेत. यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यातही काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. काही गोष्टींवर बंधन तर काही मध्ये सवलती आहेत त्यात सायकलिंग, जॉगिंग, धावणं, चालणं यासाठी सार्वजनिक ठिकाणी, बगीचांमध्ये, खाजगी मैदानांवर, सोसायटी तसंच संस्थात्मक मैदानांवर, बगीचे या ठिकाणी सकाळी 5 ते 7 या वेळेत परवानगी. मात्र इन्डोअर स्टेडियम किंवा बंदिस्त ठिकाणी यापैकी कशालाही परवानगी नाही. कोणत्याही प्रकारे एकत्र येऊन व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग अशा कोणत्याही उपक्रमाला परवानगी नाही. प्लंबर, इलेक्ट्रिशिअन, पेस्ट कंट्रोल, तंत्रज्ञ यांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून काम करण्याची परवानगी .गॅरेज तसंच वर्कशॉप यांना अपॉइंटमेंट पद्धतीने काम करण्याची परवानगी.सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के कर्मचारी वर्ग उपस्थित असेल. पाचव्या लॉकडाऊनचा कालावधी अजुनही चालुच आहे.
आता पर्यंत भारताला खुप काही समस्यांना तोंड द्यावं लागलं आहे त्यात प्रामुख्याने दवाखान्यांच्या अडचणी, औषध , कोरोना असणाऱ्या रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे व्हेंटिलेटर ही मुख्य गरज आहे परंतु त्याचा देखील फार मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. आपल्याकडे वैद्यकीय तंत्रज्ञान खुप काही विकसित नाही परंतु अमेरिका, इटली व इतर काही देशांची अवस्था पाहता आपण मात्र सुरक्षित आहोत असंच वाटतं.
लवकरच कोविड-१९ च्या उपचारासाठीच्या औषधाचा शोध लागावा हीच प्रार्थना देवाकडे आहे.
केशव प्रदिपराव बडवे
९३०९९३४०३०
Comments